Saturday, July 15, 2006

परवा दादर स्टेशनवर...

परवा दादर स्टेशनवर एक मित्र दिसला
मला तो खुप खचलेला वाटला, विचारपूस केल्यावर
लखलखत्या दिव्यांसमोरही अचानक अंधार पसरला

तो म्हणाला, परवा महालक्ष्मीला चाललो होतो
बायकोला पोरासोबत लेडीज मध्ये चढवून
स्वतः जेन्ट्स मध्ये चढलो

अचानक मोठा स्फोट झाला
हसता खेळता माझा मुलगा
काळ्या धुराआड लपला,
मी आणि बायकोने त्याचा शोध घेतला
लाल चिखलातुन त्याला अक्षरशः खेचून काढला
जरा थकलेला दिसला म्हणून
बायकोच्या कुशीत विसावला
सुजलेले डोळे किलकिले करुन मला व बायकोला म्हणाला
देवबापाने माझी आठवण काढली आहे,
बाबा मी पुढे जातो पण तुमची आठवण खूप येणार
रात्री झोपताना मला गोष्ट कोण सांगणार?

शांतपणे डोळे मिटलेल्या माझ्या मुलाकडे बघून
स्टेशनचा खांबन् खांब द्रवला
भूकंपाने धरणी काय हादरेल असा स्टेशनचा वासान् वासा कापला

पोराने पदर घट्ट धरला म्हणून
तीही सोबत गेली... दोष नसताना दु:खाचा डोंगर हाताने उकरतो आहे
त्यांचा स्म्रुतीसागरातील एकेक शिंपला भरल्या डोळ्यांनी जपतो आहे...

अचानक मित्र समोरच्या गर्दीत नाहीसा झाला
तोबा गर्दीतही तो पूर्णपणे एकाकी वाटला....

- सौजन्यः गिरिश सोनार व अर्जुन देशपांडे

1 comment:

Please note that your comment will go live immediately after you click 'Post Comment' button and after that you will not be able to edit your comment. Please check the preview if you need.

You can use some HTML tags, such as <b>, <i>, <a> etc.