Friday, August 22, 2008

pahile quiz (first quiz)

नुकतच आमच्या इथल्या मुलांसाठी चाचणी परिक्षा - क्वीझ - घेण्यात आली. बहुतेक जणांना याची सवय असते पण पहिल्या वर्षातील मुलांना हा अनुभव पहिलाच असतो. आणि हा अनुभव मनात थोडी धाकधूक, थोडी उत्कंठा निर्माण करणारा असतो. या अनुभवावर विचार करता करता काही ओळी सुचल्या. त्यामध्ये नंतर थोडी भर पडली आणि एकूण या प्रकाराने एका नादकाव्याचे रूप घेतले. ते इथे सादर करीत आहे.


पहिलं क्वीझ
आकाशात वीज
पावसात भीज
खाटेवर नीज

पहिलं क्वीझ
भीतीचे बीज
घोकम्पट्टी
वर्षाचे लीज

पहिलं क्वीझ *
मरतोय मीच
मनीच होई
कष्टाचं चीज

पहिलं क्वीझ #
उगाच झीज
जुन्या ब्रेडला
नवीन चीज

पहिलं क्वीझ
मेंदूची झीज
कशास करशी
उगाच टीज

पहिलं क्वीझ
समोर चंगीझ
आणि वर म्हणे
बी ऍट इझ

पहिलं क्वीझ
प्रश्न सोळा
फोड भोपळा
इति चंगीझ

पहिलं क्वीझ
मोकळं रान
मोडे मान
फुटे काळीज

पहिलं क्वीझ *
प्रश्न मीच
धडपडतोय अजून
दूर क्षितीज

पहिलं क्वीझ
कड कड टप टप
तड तड ठप ठप
सांडे वीज

पहिलं क्वीझ
यस यस नो नो
यस यस नो नो
यस इट इज!

पहिलं क्वीझ
आकाशात वीज
पावसात भीज
खाटेवर नीज

***

* सहाय्य : अभिजीत कुलकर्णी
# सहाय्य: गिरीश कुलकर्णी

***

kabhi khamosh baithoge - Jagjit Singh


कभी खामोश बैठोगे कभी कुछ गुनगुनाओगे
मैं उतना याद आऊँगा मुझे जितना भुलाओगे

कोई पूछ बैठेगा खामोशी का सबब तुम से
बहोत समाझाना चाहोगे मगर समझा ना पाओगे

कभी दुनिया मुकम्मल बन के आयेगी निगाहो में
कभी मेरी कमी दुनिया की हर इक शय में पाओगे

कही पर भी रहे हम तो मोहब्बत फिर मोहब्बत है
तुम्हे हम याद आएंगे हमे तुम याद आओगे

स्वर : जगजीत सिंह
"Love is Blind"