Wednesday, February 07, 2007

आठवण

सकाळी अजितचा मेसेज आला. त्यात एक छोटी कविता होती. ती अशी...

काय असते आठवण?
पाण्याचा ओलावा की अमृताचा गोडवा,
अश्रुंची धारा की झोंबणारा वारा,
पावसाच्या थंड गारा की हा आसमंत सारा! काय असते आठवण?


नुकतेच गिरीश ओकांच्या छंदाबद्दल खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकलं होते. ते म्हणे फोनवर आलेल्या काव्यात्मक निरोपांना तश्याच प्रकारे उत्तर देतात. छंद आहे तो त्यांचा. मग काय!

इकडे मनास स्फूरण चढले आणि तिकडे हाती पेन चढले, शब्द कसे एकामागून एक लाईनीमधून आले... पहा तुम्हाला आवडतात का.

आठवण..

काय असते आठवण..
दारात उभी राहून पहायची वाट?
की सर्रकन येणा-या काट्याचा थरथराट..

काय असते आठवण..
पावलोपावली चुकणारा काळजाचा ठोका?
की मागेपुढे होणारा मनाचा झोका..

काय असते आठवण..
झेपावू पहाणा-या मनाचा झंझावात?
की तळमळत तळमळत काढलेली रात..

काय असते आठवण..
का असते ती अर्ध्या मिटलेल्या डोळ्यात?
का ती असते तडफड अडकलेल्या मासळीची जाळ्यात..

फारच गोंधळ शब्दांचा आणि इकडून तिकडून गोळा केलेल्या उपमांचा, येव्हढे सगळे केले तर मला आता वाटतयं गुपचूप करावी थोडी चोरी..

तर मग,
आठवणीबद्दल आठवता उपमा साठी आमची येईल
म्हणून म्हणतो,
दुधगांवकरांनी घ्यावी मंगेश पाडगांवकरांची स्टाईल

मग वाचा पुढे..

शेवटी वाटते,

आठवण म्हणजे आठवण म्हणजे आठवण असते
दशसहस्र क्षणांची व सहस्र प्रतिमांची अंतरी साठवण असते!

***

8 comments:

  1. surekh ahe...
    first time tujhi kuthali kavita vachatoy...chhaan ahe...
    pudhilweli eka kadavyamadhalya don oli ekmekanshi sambandhit asteel ashi rachana kar...
    nahi tar "Kay asate Athavan" he fakt war ekda lihun mag khali tujhya oli maand...
    (jara jaastch suchavale na?...pan je watale te bolalo..ani ho..tujhya baakichya kavita wachayala avadel...)

    ReplyDelete
  2. too tar maajhyaa kavitechi chirphaadach karoon taakalees... :-))

    ReplyDelete
  3. how much talent are you going to gather? the knowledge in ur field, sketching, photography, singing and now poetry??? hahhaha....keep it up!

    ReplyDelete
  4. Come on Jem... it's not talent. It's was just an effort for Ajit. It happened just simply. You know that there are better people who express in much better way. That's why I reminded readers, and myself, about great poet Mangesh Padgaonkar! :-))

    ReplyDelete
  5. agadi chhan rachana aahe, ani tyat kharokhar konachi tari athavan disatey.....hehehehheehhe.....i will b waiting to read ur next kavita....

    ReplyDelete
  6. pahili 3 kadawi apratiiiiiiiiim! 4thyat jara badal suchawu ka?????????????
    Kay asate aathawan........
    Mitaleli ardhonmilit dolyat......
    Ki tadfad masolichi adakata jalyat!!!!!!!
    Mi fakt tuze shabd ikade-tikade karayacha prayatn kelay.........tula apekshit arth tyat aahe ki nahi mala mahit nahi.........
    Asawari Waikar

    ReplyDelete
  7. काय असते आठवण...???
    हसऱ्या चेहऱ्यामागाची अश्रुभरली शिदोरी,
    की अश्रुभरल्या डोळ्यांमागची साठवण सोनेरी?
    काय असते आठवण...???
    मनाच्या अंगणातले रंगीबेरंगी सण,
    की काळाच्या पडद्यावरचे मऊ मुलायम क्षण??

    ReplyDelete

Please note that your comment will go live immediately after you click 'Post Comment' button and after that you will not be able to edit your comment. Please check the preview if you need.

You can use some HTML tags, such as <b>, <i>, <a> etc.