ही वाट दूर जाते स्वप्नामधील गांवा
माझ्या मनातला ग तेथे असेल रावा
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
माझ्या मनातला ग तेथे असेल रावा
स्वप्नामधील गांवा स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला मन मुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा
माझ्या मनातला ग तेथे असेल रावा...
*** ***
गीत: शांता शेळके
संगीत: हृदयनाथ मंगेशकर
स्वर: आशा भोसले
*** ***