सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
*** ***
शब्द: मंगेश पाडगांवकर
Thanks lot sir i was looking for this poem since year.
ReplyDeleteThanks for posing it.
---Rohan Jadhav----
It is very very inspirational poem
ReplyDeleteI like this oem very much
ReplyDeleteजीव भरुन पहावे तुला एकदा
ReplyDeleteरानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.
पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्या
शुभ्र शुभ्र कळ्या होताना.
जीव भरुन पहावे तुला एकदा
अनिवार हाक प्राणात भरुन:
मोर अंधाराचा थुईथुई भिजताना
पिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.
जीव भरुन पहावे तुला एकदा
कळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;
काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणे
मिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.
जीव भरुन पहावे तुला एकदा.
जीव भरुन तुझे व्हावे एकदा.
मस्त
DeleteVery nice. ...zakaas
Deletejaganyach tatvdnyan sanganari kavita.
ReplyDeleteसुंदर कविता!! प्रेरणा देणारी
ReplyDeleteआजोबांच्या खोलीत आता धुक॑ धुक॑ ही कविता शोधतीये आहे आपल्याकडे ?
सुंदर कविता!! प्रेरणा देणारी
ReplyDeleteआजोबांच्या खोलीत आता धुक॑ धुक॑ ही कविता शोधतीये आहे आपल्याकडे ?