कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?
पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा, रितेरिते मन तुझे उरे,
ओठभर हसे हसे, उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे.
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी, सोसताना सुखावून हसशील ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?
कोण तुझ्या सौधातून, उभे असे सामसूम, चिडीचूप सुनसान दिवा,
आता सांज ढळेलच, आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा.
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण, रोज रोज नीजभर भरतील ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?
इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी, झडे सर कांचभर तडा,
तूच तूच तूझ्या तूझ्या, तूझी तूझी तूझे तूझे, सारा सारा तुझा तुझा सदा.
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून, जातांनाही पायभर मखमल ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?
आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे माळूनिया अबोलीची फुले,
देहभर हलू देत विजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले.
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना, तेंव्हा मग धरा सारी भिजवेल ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?
शब्द : संदीप खरे
Translations??!!!! :)
ReplyDeleteDifficult job... but will try some time.
ReplyDeleteBhava Jinkalas.
ReplyDeleteNad khula.
Aniruddha Kulkarni From Kolhapur