Saturday, May 09, 2009

bhatukalichya-khelaa-madhali

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राजा वदला, 'मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा'
का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
'उद्या पहाटे दुस-या वाटा, दुज्या गावचा वारा'
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी!

तिला विचारी राजा,'का हे जीव असे जोडावे?
का दैवाने फुलण्याआधी, फूल असे तोडावे ?'
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी

का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
वा-यावरती विरून गेली एक उदास विराणी

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

*** ***

शब्द : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते
राग : वृंदावनी सारंग (नादवेध)

*** ***



*** ***
bhaatukalichyaa, Mangesh Padgaonkar, Padgavkar, Yashawant Dev, Deo, Arun Date
*** ***
I have translated this song in Hindi.
Click here to read the translation.


No comments:

Post a Comment

Please note that your comment will go live immediately after you click 'Post Comment' button and after that you will not be able to edit your comment. Please check the preview if you need.

You can use some HTML tags, such as <b>, <i>, <a> etc.