सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे,
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे ||
उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू,
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ||
कळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा,
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे ||
उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे ||
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे ||
***
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा (१९८१)
राग - पटदीप (नादवेध)
***
***
"sunya sunya maiphileet majhya", "sunyaa sunyaa" from Umbaratha, Suresh Bhat, Hridaynath Mangeshkar, Lata Mangeshkar, Smita Patil, Girish Karnad
***
No comments:
Post a Comment
Please note that your comment will go live immediately after you click 'Post Comment' button and after that you will not be able to edit your comment. Please check the preview if you need.
You can use some HTML tags, such as <b>, <i>, <a> etc.