माझ बोलण, माझ चालण, माझ हसण, माझ वागण (३)
उन सावलीच्या परी, कधी नकोस हवस (२)
तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस, ह ह तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस
(कधी वाटते म्हणावे, गीत केवळ आजचे
आणि डोळ्यांच्या तळ्यात, दीप सोडावे कालचे) (२)
कुणी वाहती तळ्यात, कुणी हळव्या डोळ्यात (२)
तुम्ही कासावीस, हो हो तुम्ही कासावीस, ह ह तुम्ही म्हणाल तस, हो तुम्ही म्हणाल तस
(दिसभर आसावलो, एका कवड्याश्यासाठी
सांज ढळता ढळता, ऊन पोचल दाराशी) (२)
आता सावलीच्या ओठी, येड्या ऊनाची बासरी (२)
गाण येडपिस, हो हो गाण येडपिस, हो हो तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस
(पैलतीर गाठताना, आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला, पैलतीर ऐलतीर) (२)
(जीव कोणत्या काठचा, कुण्या नाहीश्या गावचा) (२)
आता म्हणाल तस, हो हो आता म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस, हा हा तुम्ही म्हणाल तस
माझ बोलण ...
शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"
Pages
▼
Sunday, July 27, 2008
man talyaat malyaat - Sandeep Khare
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात (२)
मन नाजुकशी मोतिमाळ (२) तुझ्या नाजुकश्या गळ्यात
मन तळ्यात ...
पुरी चाहुलींचे मृ गजळ (३)
वाजे पाचोळा मृ गी कश्यात ||१||
मन तळ्यात ...
इथे वार्या ला सांगतो गाणी, माझे राणी
इथे वार्या ला सांगतो गाणी
आणि झुळूक तुझ्या मनात ||२||
मन तळ्यात ...
भिडू लागे रात्र अंगाला गे, हो ... हो!
भिडू लागे रात्र अंगाला गे
तुझ्या नखाची कोर नभात ||३||
मन तळ्यात ...
माझ्या नयनी नक्षत्र तारा (३)
अन चांद तुझ्या डोळ्यात ||४||
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात
शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"
मन नाजुकशी मोतिमाळ (२) तुझ्या नाजुकश्या गळ्यात
मन तळ्यात ...
पुरी चाहुलींचे मृ गजळ (३)
वाजे पाचोळा मृ गी कश्यात ||१||
मन तळ्यात ...
इथे वार्या ला सांगतो गाणी, माझे राणी
इथे वार्या ला सांगतो गाणी
आणि झुळूक तुझ्या मनात ||२||
मन तळ्यात ...
भिडू लागे रात्र अंगाला गे, हो ... हो!
भिडू लागे रात्र अंगाला गे
तुझ्या नखाची कोर नभात ||३||
मन तळ्यात ...
माझ्या नयनी नक्षत्र तारा (३)
अन चांद तुझ्या डोळ्यात ||४||
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात
शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"
Tuesday, July 08, 2008
MRTS
Thursday, July 03, 2008
man vadhaay vadhaay - sant bahiNaabaai
मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर || १ ||
मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा || २ ||
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादनं || ३ ||
मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
आता गेलं आभायात || ४ ||
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचू - साप बरा
त्याले उतारे मंतर! || ५ ||
मन चपय चपय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धरीवर || ६ ||
मन येवढं येवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना || ७ ||
देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियांत!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामात! || ८ ||
देवा आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं! || ९ ||
- संत बहिणाबाई
या कवितेमध्ये बहिणाबाईंनी मनाच्या आंदोलनांचे नितांत सुंदर वर्णन केले आहे. आपल्या सर्वांना या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे मनाच्या चंचलतेचा अनुभव अनेक वेळा आला असेल. ही कविता आम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात होती. या कवितेला मानिनी या चित्रपटात १९६१ मध्ये गाण्याच्या स्वरूपात स्थान ही मिळाले. हे गाणे आशा भोसले यांनी गायले होते. या चित्रपटाला संगीत वसंत पवार यांचे होते.